टोपीवाला हायस्कूलची स्थापना १० एप्रिल १९११ रोजी झाली. शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन मालवणमध्ये एक नवीन हायस्कूल काढण्याचा संकल्प स्व. बाबासाहेब वराडकर, स्व. बापूसाहेब देसाई, स्व. कृष्णराव देसाई, स्व. विनायक आजगावकर आणि स्व. डॉ. राजाराम आजगावकर यांनी आखला. भाऊसाहेब टोपीवाले यांनी शाळेसाठी दहा हजार रुपये देणगी दिली. या देणगीमुळे शाळेची सुरुवात झाली.
जागेअभावी मालवण बंदरावरील लाडोबांच्या वखारीत शाळा भरु लागली. त्यानंतर झांट्ये, कामत, शेठ विठ्ठलदास यांच्या वखारी भाड्याने घेऊन शाळेचे वर्ग त्या काळात चालले. शाळेसमोरच्या अडचणी व गरजा लक्षात घेऊन स्व. भाऊसाहेब टोपीवाले यांनी सव्वा लाखाची देणगी देऊन शाळेची इमारत उभी केली व शाळेच्या इतर खर्चाकरिता पंच्याहत्तर हजार रुपये दिले. शाळा, मैदान, वसतीगृह यांसाठी पंधरा एकर जागा उपलब्ध करुन दिली.पुढे वाचा >>