ठळक वैशिष्ट्ये

सुविधा:

  • प्रकाशित, हवेशीर, प्रशस्त वर्ग असणा-या ईमारती
  • पुस्तके, कादंब-या, निबध, ग्रंथ यांच्या ठेवीने सुसज्ज असलेले ग्रंथालय
  • तीन संगणकिय प्रयोगशाळा, १. माहिती तंत्रज्ञान विभागाकडील २५ संगणक, २ प्रिंटर, १ एल सी डी प्रोजेक्टर , इंटर नेट सुविधा ने
  • सुसज्ज अशी माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा २. प्राथमिक व माध्यमिक शाळेकरीता २० संगणक असलेली संगणक प्रयोगशाळा ३. ITC प्रयोगशाळा
  • क्रिकेट, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
  • व्यायामशाळा
  • स्मार्ट बोर्ड सहीत डिजीटल प्रयोगशाळा
  • दृकश्राव्य खोली.
  • सभागृह.
  • ग्राहक भांडार
  • टाईपरायटींग इंस्टिट्युट

अध्यापक:

  • पात्र, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक
  • तज्ञ संगणक प्रशिक्षक,
  • रंगमंच आणि कला शिक्षक

विद्यार्थी :

  • शाळेच्या जागेपासुन सुमारे (३० किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
  • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०.
  • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची संधी दिली जाते.

अभ्यासक्रम :

  • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
  • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
  • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
  • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.