आपल्या शाळेचे नामवंत, कीर्तिवंत…….

आपल्या शाळेचे नामवंत, कीर्तिवंत…….

१. श्री. सदाषिव का. पाटील :  १९२० मध्ये राष्ट्रीय स्वातंत्र चळवळीला प्रारंभ, त्यामुळे ८ वेळा कारावास, भारतीय कॉंंग्रेस  कार्यकरणीचे सदस्य व खजीनदार. १७ वर्षे मुंंबई प्रदेश कॉंंग्रेस  कमिटीचे जनरल सेक्रेटरी व त्यानंतर त्याच समितीचे अध्यक्ष. मुंंबई पालिकेचे माजी महापौर म्हणून ३ वेळा निवड. भारत सरकारचे पाटबंधारे, वीज, दळणवळण व अन्न व शेती या खात्यांचे माजी मंत्री.

२.श्री.भालचंद्र पु. आडारकर :  मुंंबई  विदयापिठ मॅट्रीक परीक्षेत सर्व विदयार्थ्यांंमध्ये  ४ क्रमांक. केंब्रीज विदयालयाची अर्थशास्त्राची एम. ए. ही पदवी. भारत सरकारच्या अर्थखात्याचे प्रमुख. भारत सरकारचे आर्थिक व व्यापार विषयक प्रतिनिधी म्हणून अनेक देशात नेमणुका. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ.

३. श्री. गजानन रा. कामत : शाळेतील अत्यंत हुषार विदयार्थी. आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण. निरनिराळया सरकारी खात्यांचे सेक्रेटरी व एल. आय. सी. चे अध्यक्ष. भारतीय फायनान्स कमिशन सभासद व कार्यवाह.

४. प्रो. श्री. विष्णू अ. देसाई : राजाराम काॅलेज मध्ये गणित चे प्राध्यापक, गणित विषयाचे तज्ञ असा लौकीक.

५.श्री. विष्णू म. परूळेकर : भारत सरकारचे औदयोगिक खात्याचे सेक्रेटरी, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख, डाॅ. भाभा यांचे वैयक्तिक सल्लागार.

६.प्रो. श्री. विश्वनाथ द. साळगांंवकर : बडोदा येथे इंग्रजीचे प्राध्यापक व नंतर प्राचार्य. सेवा निवृत्तीनंतरही एस. एन. डी.टी. विश्वविदयालयाच्या बडोदा येथील काॅलेज मध्ये प्राध्यापक.

७. श्री. धोंडी रा. खवणेकर: अनेक वर्षे मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल येथे मुख्याध्यापक. अतिशय शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द. आपल्या कारकीदींत सदर संस्थेस त्यांनी भरभराटीला आणले.

८. श्री. गंगाधर दे. खानोलकर: मराठी साहित क्षेत्रातील सर्वश्रुत नाव, विशेषतः मराठी चरित्र वाङ्मयात बहुमोल भर.

९.डाॅ. श्री. श्रीधर शा. आजगावकर :  मालवण एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, त्याचप्रमाणे १९३९ ते १९४५ या काळात कार्यकारीणीचे चेअरमन. विश्वविख्यात मधुमेह तज्ञ. प्रचंड संशोधन कार्य, शैक्षणिक व वाङ्मयीन संस्थामध्येही भरीव कार्य.

१०. श्री. के. डी. निगुडकर : राॅयल इन्स्टिटयुट आॅफ सायन्स मध्ये संशोधनात्मक कार्य करून रसायनशास्त्राची एम. एस. सी. पदवी संपादन, व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नीकल इंस्टीटयूटमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक. अनेक कंपन्यांसाठी कन्सल्टिंंग, मार्गदर्शन.

११. श्री. श्रीपाद स. महाजन :  भारतीय स्वातंत्र चळवळीत अग्रभागी व त्यामुळे अनेक वेळा कारावास. महात्मा गांधी यांचे निष्ठावान व श्रेष्ठ अनुयायी, १९४६ते १९५२ मध्ये मुंंबई  असेंंब्लीचे सभासद.

१२. श्री. सखाराम रा. शिखरे : समानता या जिल्हावृत्तपत्राचे संपादक. पुणे विश्वविदयालयाच्या सिनेटवर निवड. रत्नागिरी स्कूल बोर्डाचे काही काळ चेअरमन.

१३.  श्री. अनंत रा. कामत :  १९२९ साली मुंंबई  विश्वविदयालयाच्या माॅट्रीक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण. फर्ग्युसन काॅलेजमध्ये प्राध्यापक.

१४. श्री. श्रीधर वि. चव्हाण : सचिवालयात अनेक महत्त्वाच्या व जबाबदारीच्या जागांवर काम. पुण्याचे कलेक्टर.

१५. श्री. राजाराम शा. पाटकर : चित्रकला या विषयाच्या संदर्भात सर्वश्रुत नाव. ईन्स्पेक्टर आॅफ ड्राईंग व क्राफ्ट, महाराष्ट्र राज्य,या हुद्दयावर काम.

१६. श्री. दत्तात्रय मु. देऊलकर :  ख्यातनाम प्रशासक, महाराष्ट्र राज्याचे अर्थखात्याचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून निवृत्त.

१७. श्री. दामोदर रा. सामंत : काही काळ नॅशनल हेराॅल्ड या इंग्रजी वृत्तपत्राशी निगडीत. महाराष्ट्र राज्याच्या प्रसिध्दी कार्यालयात डायरेक्टर आॅफ पब्लीसीटी म्हणून निवृत्त.

१८. श्री. हरी ध. गावकर : नाववंत शिक्षणतज्ञ. डाॅ. शिरोडकर यांनी परळ परिसरात काढलेल्या शिक्षण संस्थेचे प्रमुख. मुंंबई काॅर्पोरेशनचे सभासद व स्कूल कमिटीचे चेअरमन.

१९ . श्री. विश्वनाथ अ. आजगांवकरः   इंग्लड मधून उच्च शिक्षण, मालवण कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे पूर्व विश्वस्त व आधारस्तंभ.

२०. श्री. नारायण नरसिंह देसाई : किशोर पम्पस् या विख्यात कंपनीचे संस्थापक. शाळेबद्दल विशेष आस्था.

२१. श्री. लक्ष्मण ह. आजगांंवकर: सचिवालयात महसूल खात्याचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून निवृत्त.

२२. श्री. शिवराम के. परूळेकर: टोपीवाला हायस्कूलचे गुरूवर्य कै. तात्यासाहेब परूळेकर यांचे चिरंजीव. अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकार पदावर काम.

२३. डाॅ. डी.डी. खानोलकर: काही काळ राॅयल इन्स्टिटयुट आॅफ सायन्स व खडकी येथे शस्त्रनिर्मिती केद्रात प्रमुख. औरंगाबाद काॅलेजचे प्राचार्य.

२४. श्री. मनोहर ग. सामंत: पुणे इंजिनिअरिंग काॅलजचे व्हाईस प्रिन्सिपाॅल, सांस्कृतिक देवाण घेवाण योजनेखाली अमेरिका व इग्लंड या देशात वेळोवेळी भेटी.

२५. डाॅ. विजय नारिंग्रेकर : फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयात अमेरिकेतील विदयापीठाकडून डाॅक्टरेट. सध्या अमेरिकेत ब्रिस्टाॅलमायर्स या जगद्विख्यात औशध कंपनीमध्ये सेवाज्येष्ठ  मुख्याशास्त्रज्ञ.

२६. श्री. केषव कृ. गाडगीळ: एअर इंडिया इंटरनॅशनलचे ग्राऊंड इंजिनियर, रेस्ट न्यू वे, लोणवळा येथे आश्रमात निष्काम वृत्तीने कार्यरत.

२७. श्री. एच. एस. धारगळकर : मुंंबई  येथे स्वतःचा प्रेस स्टुडियो चालवून यश व किर्ती यांचे संपादन. जे. जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चर या संस्थेत प्राध्यापक.

२८. श्री. पी. ए. धोंड: जेष्ठ कलावंत आणि जे. जे. स्कूल आॅफ आर्ट चे डीन. रापण या पुस्तकाचे लेखक.

२९. श्री. चंद्रकांत द. सावंत: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिव्हील जज्ज व मॅजिस्ट्रेट म्हणून कार्य केले.

३०. श्री. अनंत र. वालावलकर: सिव्हील जज्ज व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून कार्य केले.

३१. श्री. नारायण गो. गोगाटे: सिव्हील जज्ज व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून कार्य केले.

३२. डाॅ. दत्ता सामंत : सुप्रसिध्द कामगार नेते व मुत्सध्दी राजकारणी.

३३. श्री. रघुनाथ उर्फ बापूसाहेब गो. कामत : अमेरिकेशी सचोटीने काजूचा मोठया प्रमाणात व्यापार करणारे सुप्रसिध्द काजुकारखानदार व दानशूर व्यक्ती.

३४. श्री. दिनेश ना. देसाई: समाजकारण व राजकारण क्षेत्रातील सुप्रसिध्द नाव

३५. डाॅ. जे.एन. करंडे: प्रख्यात स्त्रीरोग चिकित्सक व प्रसुतीतज्ञ.

३६. श्री. मोरेश्वर रा. आजगांवकर : सुप्रसिध्द करसल्लागार, दानशूर गृहस्त.

३७. श्री ज्ञानेश देऊलकर:  भंडारी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल मधील सेवानिवृत्त शिक्षक. विविध सामाजिक चळवळीतील भाग. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण चे विश्वस्त.

३८. श्री उमेश धारगळकर : शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये स्थान. आय. टी. मुंबई मधून उच्च शिक्षण (बी. टेक) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत स्थापत्यविशारद.

३९. श्री. चंद्रशेखर श्री. गोगाटे : १९६६ चे एस.एस.सी.बॅचचे विदयार्थी , शिक्षण एम.एस.सी. सिंडीकेट बॅंक मधून उच्चाधिकारी म्हणून सेवानिवृृत्त.

४०. श्री. श्रीपाद वाघ : नॅशनल हेराॅल्ड चे माजी संपादक.

४१. श्री. सुरेश दि. सामंत: आय.आय.टी. मुंंबईच्या पहिल्या बॅचचे विदयार्थी, अमेरिकास्थित कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर ४०वर्षे कार्यरत. मालवण फांऊडेशनचे मुख्य विश्वस्त. दानशूर व्यक्तिमत्त्व.

४२. डाॅ. रविंद्र बा. तिरोडकर: एशियन पेंंटस्  लि. कंपनीचे माजी टेक्नीकल डायरेक्टर.

४३. श्री. विनायक जे. सामंत : मदुरा कोट्स लि. मधून मार्केटिंग डायरेक्टर म्हणून सेवानिवृत्त.

४४. श्री. शरद म. परूळेकर : प्रख्यात तरूण कारखानदार. १९६५ मध्ये शालांत परीक्षेत मेरीटलिस्ट मध्ये येणारे टोपीवाला हायस्कूलचे पहिले विदयार्थी.

४५. श्री. सुभाष भांडारकर : व्होल्टास कंपनीचे फायनान्स डायरेक्टर म्हणून सेवानिवृत्त.

४६. डाॅ. व्ही. ए. पडवळ:  ड्रग्स् कन्ट्रोलर व बायोलाॅजिकल इव्हांस लि. चे संचालक.

४७. श्री. जयवंत कामत: गोव्यातील प्रख्यात उदयोगपती व दानशूर व्यक्ती.

४८. डाॅ. सुभाष बी. ठाकूर : जेनेटीक इंजिनियरींग विषयात आय. आय. टी. ची डाॅक्टरेट ही पदवी संपादन केली. सध्या पाॅलीमर्स्  क्षेत्रातील उदयोगपती.

४९. श्री. मोहन बी. सामंत : बॅंक आॅफ बडोदा चे सिनियर जनरल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त.

५०. डाॅ. मोहन आचवल:  मिशिगन, अमेरिका येथील सुप्रसिध्द बालशल्य चिकीत्सक.

५१. श्री. मोहन दि. सामंत: क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीमध्ये व्यवसायानिमित्त अनेकदा परदेश भ्रमण. शिक्षण क्षेत्राची विशेष आवड.