१०० वर्षातील नोंंदी

१०० वर्षातील नोंंदी

मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित
अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल , मालवण
गेल्या १००वर्षातील काही ठळक नोंदी

 • १० एप्रिल १९११ : टोपीवाला हायस्कूल ही शाळा सुरू झाली.
 • ११ मे १९१२ : जिल्हाधिकारी श्री. एच. बी. क्लीटन यांनी मुख्य इमारतीच्या पायाचा दगड बसविला.
 • सन १९१२ : शाळेला सरकारी मान्यता मिळाली व १९१३ पासून सरकारी अनुदान मिळण्यास प्रारंभ झाला.
 • ३१ मार्च१९१३ : मालवणच्या जनतेने अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांना कृतज्ञतापूर्वक मानपत्र अर्पण केले.
 • ९ एप्रिल १९१५ : जिल्हाधिकारी श्री. जे. अे. मदन यांच्या अध्यक्षतेखाली मॅनेजींग बोर्डाची पहिली सभा संपन्न झाली.
 •  सन १९१६ : संस्थेच्या घटनेस कायदेशीर मान्यता मिळाली.
 • जून १९१७ : टोपीवाला हायस्कूलची मुख्य इमारत बांधून पूर्ण झाली. जून १९१७ पासून या नव्या प्रशस्त इमारतीस वर्ग भरू लागले.
 •  जून१९१७ : अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांना सरकारने रावबहादुर पदवी देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याविषयीची गुणग्राहकता व्यक्त केली.
 • २३ सप्टेंबर १९१८ : मालवण एज्युकेशन सोसायटी रजिस्टर्ड संस्था बनली. तत्पूर्वी १९१५  मध्ये संस्थेची स्थापना.
 • १९१९ : श्री. विष्णू भिकाजी खंडाळेकर यांचे नावे श्री. दत्तात्रय विनायक खांडाळेकर यांच्या देणगीतून विज्ञानप्रयोगशाळा बांधण्यात आली.
 • १५एप्रिल १९२१ : अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांचे निधन झाले.
 • ४ एप्रिल १९२४ : तत्कालीन मुख्ययाध्यापक स्व. रा. भि. परूळेकर यांनी टोपीवाला हायस्कूलमध्ये सुरू केलेल्या बी. टी. परीक्षेच्या ट्रेनींग क्लासला मुंबई विदयापीठाची संमती मिळाली.
 • सन १९२५ : टोपीवाला हायस्कूलच्या इमारतीत प्राथमिक प्रमाणपत्र परीक्षेचे केंद्र सुरू झाले व दक्षिण रत्नागिरी मधील मुलांची सोय झाली.
 • सन १९२६ व १९२७ : कार्यालयाची इमारत, ड्राॅईंग हाॅल , सुतारकाम वर्ग बांधण्यात आले.
 • १९३१-१९३२ : बोडींग ग्राऊंड येथे वसतिगृहासाठी २ इमारती बांंधण्यात आल्या.
 •  सन १९३३ : श्री. नारायणराव अनंत देसाई टोपीवाले यांचे निधन.
 •  सन १९३७ – १९३८ : बोडींग ग्राऊंड येथे सुपरिटेंडेन्ट यांच्यासाठी स्वतंत्र बंगला बांधण्यात आला.
 • १ मार्च १९५२ : टोपीवाला हायस्कूलच्या आवारात प्राथमिक शाळा (इयत्ता १ ली ते ४ थी ) सुरू करण्यात आली.
 • डिसेंबर १९५३ : रत्नागिरी जिल्हाधिकारी हे संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष आतापर्यंत होते, तथापि सरकारने संस्थेच्या घटनेत दुरूस्ती करून जिल्हाधिकारी यांचे ऐवजी जिल्हा शिक्षणाधिकारी यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
 •  इ. स. १९५४ : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण संस्था संघाचे अधिवेशन संपन्न झाले.
 •  मार्च१९५५ : टोपीवाला हायस्कूलमध्ये एस. एस. सी. परीक्षेचे केंद्र सुरू करण्यात आले.
 • ११ जानेवारी १९५८ : टोपीवाला हायस्कूलमध्ये वक्तृत्व मंडळ , वाङमयमंडळ, शास्त्रमंडळ, कलामंडळ अशा मंडळाची स्थापना झाली.
 •  सन १९५८ : शाळेच्या आवारात उभारलेल्या मंडपात महाराष्ट्र  साहित्य संमेलन संपन्न झाले.
 • १८ डिसेंबर १९६० : शाळेचे माजी विद्यार्थी व भारताचे तत्कालीन कृषी व अन्नमंत्री नाम. स. का. पाटील यांनी शाळेला भेट दिली.
 • १७ एप्रिल १९६१ : महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री व भारत सरकारचे संरक्षण मंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांनी शाळेला भेट दिली.
 • २०  जून १९६३ : विद्यालयात एस. टी. सी. इन्स्टिटयूटची स्थापना. सन १९६५  एस. एस. सी परीक्षेत कुमार शरद म. परूळेकर महाराष्ट्रात २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
 • सन १९६३ : मान. श्री. स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला.
 •  जून१९६४ : शाळेत शासकीय मान्यता मिळालेली टाईपरायटींग इन्स्टिटयूट सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे हिन्दी शिक्षक सनद परीक्षेची तयारी करून घेणारे वर्ग सुरू करण्यात आले.
 • सन१९६८ : ‘दिगंबर स्मृती’ ही इमारत बांधण्यात आली. मान. बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या देणगीतून ५ वर्गखोल्यांची नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली.
 • २९,३०, एप्रिल व १ मे १९७२ : संस्थेचा हीरकमहोत्सव संपन्न झाला. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मान. दयानंद बांदोडकर हे अध्यक्ष.
 •  इ. स.१९७५ : शाळेत कला, वाणिज्य, विज्ञान विभागाचे ज्युनियर काॅलेजचे वर्ग सुरू करण्यात आले.
 •  श्रीमंत सीताराशेठ टोपीवाले यांच्या देणगीतून रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयासाठी नवीन प्रयोगशाळा बांधण्यात आली.
 •  गौड ब्राम्हणसभेच्या वतीने रा.ब.अनंत षिवाजी देसाई टोपीवाले यांच्या ब्राॅझचा पुतळा विद्यालयाच्या बागेत स्थापन करण्यात आला.
 • टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने शाळेतील मुलांमुलींसाठी सुसज्ज, अद्ययावत नवीन प्रसाधनगृह बांधून दिले.
 •  स्व. बापूसाहेब व स्व. नलिनीताई पंतवालावलकर यांच्या देणगीतून प्राथमिक शाळेसाठी नवीन इमारत व गेस्ट हाऊस बांधण्यात आले.
 • स्व. कमलाकर व स्व. कमलिनी झांटये यांच्या सुविद्य मुलींनी शाळेला ग्रंथालयासाठी नवीन खोली बांधून दिली.
 •  मार्च १९८२ : टोपीवाला हायस्कूलचे नियतकालिका ‘ज्ञानज्योती’ चा पहिला अंक प्रसिध्द झाला.
 • १९८५ं – १९८६ : डाॅ. श्री. पंढरीनाथ प्रभू व स्व. बापूसाहेब पंतवालावलकर या दोन माजी विद्यार्थ्यांंना  डाॅ. एस. एस. आजगांवकर ताम्रपत्र बहाल करून या वार्षिक उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
 • १९८७ : शाळेचा अमृतमहोत्सव स्व. दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व स्व. बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 • आॅगस्ट २००४ : मालवण एज्युकेशन सोसायटीसाठी जिल्हा न्यायालयात नवीन घटना मंजूर केली.
 • २००४ – २००५ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेषी परस्पर सामंजस्य करार करून बोडींग ग्राऊंड येथील इमारतीत ‘सागर संशोधन केंद्र’ कार्यन्वित झाले. दिनांक 26-04-2005 रोजी मान. नाम. श्री. शरदराव पवार, कृषीमंत्री, भारत सरकार यांनी या प्रकल्पाचे रीतसर उद्घाटन केले.
 • २००५ – २००६ : एम. जी.टी. फाऊंडेशनच्या व अन्य देणगीदारांच्या देणगीतून शाळेची संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आली.
 •  जून २००५ : श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या देणगीतून संस्थेच्या जय गणेश इंग्लीश मिडीयम स्कूलच्या पहिलीच्या वर्गाला प्रारंभ.
 •  सौ. आरती कुलकर्णी या पत्रकार भगीनीच्या मार्गदर्शनाखाली शाळेत डाॅल्फीन क्लबची स्थापना. त्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या सहकार्याने काढलेल्या ‘गाज’ हा माहितीपट खूपच लोकप्रिय झाला.
 •  दि. ११.०६.२००७ : ज्योतिर्भास्कर श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या देणगीतून साकारलेल्या ‘जय गणेश इंग्लीश मिडीयम स्कूल ’ च्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
 • २००८-२००९ : शाळेत उच्च माध्यमिक वर्गासाठी ‘माहिती तंत्रज्ञान’ हा विषय सुरू केला. त्यासाठी मालवण फाऊंडेशन, मुंंबई, श्री. विकासशेठ टोपीवाले यांच्या देणगीतून नवीन अद्ययावत संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
 •  २००८-२००९ : श्रीमती शालीनी मधुकर सामंत यांच्या देणगीतून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली.
 •  दि.१४  व१५ एप्रिल २०११ : शाळेचा शतकमहोत्सव सांगता सोहळा संपन्न झाला. याच दिवषी स्व. मोहनराव परूळेकर व स्व. सांगावकर गुरूजी यांचे नावे बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले.