संपादित यश – शिक्षक
- सौ. राखी अरदकर – नॅशनल अवार्ड
बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर महाराष्ट्र ओ एच एच रेअर ब्लड ग्रुप असोशिएशन,महाराष्ट्र राज्य 30/10/2018 रोजी भारता मधील 29 राज्यातील रूग्णसेवा,समाजसेवा,शिक्षण,कला आदि क्षेञात काम करणार्या मान्यवरांत सौ.राखी आणि श्री.देवदत्त अरदकर या उभयतांना नॅशनल अवार्ड सन्मानित करण्यात आले .* सामाजिक व पर्यावर्णीय परिप्रक्ष्यातून कलेकडे पाहणारे कलासक्त चित्रकार सौ. राखी अरदकर आणि श्री.देवदत्त अरदकर …… कलेच्या विकासाबरोबर पर्यावरण संवेदना जागृतीसाठी कोकणात काम करणारया अरदकर जोडप्याने माणसाचा अति हव्यास , समुद्री प्रदुषण व यांत्रिक मासेमारीमुळे होत असलेल्या नैसर्गिक ऱ्हासाकडे कलेच्या माध्यमातून संवेदनशील समाजाचे लक्ष वेधले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलात्मकता त्यांच्या चित्रांमधून जाणवत रहाते. आजुबाजुच्या परिसराशी त्या तादात्म्य पावल्या आहेत, म्हणूनच निसर्गातले सूक्ष्म बारकावे आणि नाजूक हळवे क्षण त्यानी हुबेहूब साकारले आहेत.
सुमारे तीन किलोमीटर परीघ व्यापून राहिलेलं कोळ्याचं जाळं, त्याच्या क्षिद्रांच्या छोट्या-छोट्या आकारामुळे पकडले जाणारे लहान मासे, मोठे मासेही प्रजननाच्या वेळीच पकडले गेल्याने होणार नैसर्गिक संपतीचा ऱ्हास असा एरवी क्लिष्ट वाटणारा विषयही त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून लिलया हाताळला आहे.
व्यावसायिक हेतूने मासेमारी करताना स्वार्थी मनुष्य हव्यासापायी जैवविविधतेकडे, निसर्गसंपत्तीकडे दुर्लक्ष करतो. लोभापायी सृष्टीचा विनाश कारायला निघालेला हा भस्मासूर स्वत:च भस्म होण्याच्या मार्गावर आहे. तंत्रज्ञानाची झापडं लावलेल्या माणसाच्या संवेदना जागृत करताना यांच्या मनातील अंतर्गत संघर्ष आणि स्वत:चा शोध घेताना त्यांच्या हातून घडलेल्या अप्रतिम कलाकृती आणि कार्याचा गौरव व्हावा म्हणून [29/08, 2:36 pm] Suhas Patil.: सामाजिक व पर्यावर्णिय परिप्रक्ष्यातून कलेकडे पाहणारे कलासक्त चित्रकार सौ. राखी अरदकर आणि श्री.देवदत्त अरदकर …… कलेच्या विकासाबरोबर पर्यावरण संवेदना जागृतीसाठी कोकणात काम करणारया अरदकर जोडप्याने माणसाचा अति हव्यास , समुद्री प्रदुषण व यांत्रिक मासेमारीमुळे होत असलेल्या नैसर्गिक ऱ्हासाकडे कलेच्या माध्यमातून संवेदनशील समाजाचे लक्ष वेधले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलात्मकता त्यांच्या चित्रांमधून जाणवत रहाते. आजुबाजुच्या परिसराशी त्या तादात्म्य पावल्या आहेत, म्हणूनच निसर्गातले सूक्ष्म बारकावे आणि नाजूक हळवे क्षण त्यानी हुबेहूब साकारले आहेत.
सुमारे तीन किलोमीटर परीघ व्यापून राहिलेलं कोळ्याचं जाळं, त्याच्या क्षिद्रांच्या छोट्या-छोट्या आकारामुळे पकडले जाणारे लहान मासे, मोठे मासेही प्रजननाच्या वेळीच पकडले गेल्याने होणार नैसर्गिक संपतीचा ऱ्हास असा एरवी क्लिष्ट वाटणारा विषयही त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून लिलया हाताळला आहे.
व्यावसायिक हेतूने मासेमारी करताना स्वार्थी मनुष्य हव्यासापायी जैवविविधतेकडे, निसर्गसंपत्तीकडे दुर्लक्ष करतो. लोभापायी सृष्टीचा विनाश कारायला निघालेला हा भस्मासूर स्वत:च भस्म होण्याच्या मार्गावर आहे. तंत्रज्ञानाची झापडं लावलेल्या माणसाच्या संवेदना जागृत करताना यांच्या मनातील अंतर्गत संघर्ष आणि स्वत:चा शोध घेताना त्यांच्या हातून घडलेल्या अप्रतिम कलाकृती आणि कार्याचा गौरव व्हावा म्हणून बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर महाराष्ट्र ओ एच एच रेअर ब्लड ग्रुप असोशिएशन,महाराष्ट्र
भारता मधील 29 राज्यातील रूग्णसेवा,समाजसेवा शिक्षण,कलाक्षेञात अग्रगण्य राहून आदर्शवत काम करीत आहेत अशा आदर्शांचा अशा मान्यवरांना नैशनल अवार्ड देवून आम्ही गौरव करीत असतो… या वर्षाचा सन 2019 चा सृ कलाक्षेञातील कार्याबद्दल…आम्ही सौ.राखी आणी श्री.देवदत्त अरदकर यां उभयतांना दि.30/10/2018 रोजी नॅशनल अवार्ड देवून गौरविण्यात आले.